टीम मंगळवेढा टाईम्स ।
वय वर्ष ६५ पूर्ण असेल तर तुम्हाला शासनाकडून ३ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. होय, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वृद्ध नागरिकांना शासनाकडून ३ हजार रुपये देण्याची योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.
या योजनेची अंमलबजावणी समाजकल्याण विभागाकडून सुरू असून ज्यांचे उत्पन्न २ लाखांच्या आत आहे, अशा वृद्धांनी समाज कल्याण विभागाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने,
उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात ‘ मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक (ज्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील असे), लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाखांच्या आत असावे.
याबाबतचे लाभार्थ्याने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि
सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नसावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील,
पात्र लाभार्थ्यांने बँकेच्या खात्यात रूपये ३ हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर या योजनेअंतर्गत आवश्यक उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सादर करावे लागणार आहे.
आदी कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले असावे), उपकरण किंवा साहित्याचे दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेले असावे)
आदी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज