टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनेनं सध्या महाराष्ट्रा हादरला असून बदलापूरच्या एका शाळेत चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा सरकारच्या केंद्रस्थानी आला आहे.
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, घरगुती हिंसाचाराच्या घटनेवरुन अनेकदा महिला आपलं जीवन संपवतात, अशाही घटना घडल्या आहेत.
मात्र, चक्क सासू व पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी मृत युवकाने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये आत्महत्येस पती व तिची मैत्रिण जबाबदार असल्याचं म्हटलंय.
सासरच्या जाचास कंटाळून जावयानेच आत्महत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. पत्नीसह सासरच्या मंडळीने जावयास मानसिक व आर्थिक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप याप्रकरणात करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून सुगंधा पवार, हरी काळू देवरे, रत्ना हरी देवरे, संध्या मनोहर मांडवळे व मोना गणेश जेऊघाले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 संशयित आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी, विशेष बाब म्हणजे पत्नी आपल्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून माझा मानसिक छळ करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
याबाबत प्रभाकर हरी पवार (रा.सावतानगर, सिडको) यांच्याकडून फिर्याद देण्यात आली. पवार कुटुंबीय बाहेरगावी असतांना संशयीत सून सुगंधा, तिचे आई-वडिल, बहिण व बहिणीची पुणेस्थित मैत्रीण आदींनी मृत मुलगा हेमंत प्रभाकर पवार (45 रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यास मानसिक व आर्थिक त्रास दिला.
या त्रासास वैतागून मुलगा हेमंत पवार याने गेल्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेनं पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून कर्ता पुरुष आणि लेक गमावल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (स्रोत:ABP माझा)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज