mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 24, 2026
in राज्य
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

राज्यात एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लाागली आहे. सगळीकडे वातावरण तापत चाललं आहे. अशातच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नांदेडमध्ये विजाच्या कडकडाटांसह पावसाने सर्वत्र हजेरी लावली.

हिमायतनगर भागामध्ये विज पडबून एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर यवळमाळमध्ये विज पडून ५ जण जखमी झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात काल दुपारी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्हयातील कंधार, लोहा आणि नायगाव मध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मोठा पाऊस झाला. हदगाव, हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. अशातच हिमायतनगर तालुक्यातील पार्डी इथं सायंकाळी सुमारे ५.३० वाजेच्या दरम्यान अचानक वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना विज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशाखा येलकेवाड (वय ३०) असं मृत महिलेचं नाव आहे.

विशाखा येलकेवाड या शेतात हळद काढण्याचं काम करत होता. अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस लगेच जाईल, अशी त्यांची धारणा होती. पण, अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि अंगावर विज कोसळली.

विज अंगावर पडल्यामुळे विशाखा या जागेवरच कोसळल्या. त्यांच्यासोबत काम करत असलेल्या इतर शेतमजुरांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेमुळे पार्डी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. येलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती तलाठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून महसूल विभागाकडून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पिकांचं अतोनात नुकसान

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगाव तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गहू आडवा पडला आहे. तर काही ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात २ दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

वीज पडून 5 जण जखमी

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पावसाने हजेरी लावली. राळेगाव तालुक्यातील झरगड इथं वीज पडून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रामचंद्र पचारे, गणेश नने, विमल पदिले, सुनीता राऊत, वंदना पदीले अशी जखमींची नावं आहेत. शेतात काम करत असताना विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात 5 जण जखमी झाले. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट

दरम्यान, वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि गारपिटीमुळे अनेक गावांतील रब्बी पिकांचं अंशतः नुकसान झाले आहे. कानगाव, गाडेगाव, अलमडोह, अल्लीपूर, रोहणखेडा, नांदगाव, टाकळी दरणे, चाणकी आणि गोजी शिवार परिसरात अचानक गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

शेतात काढून ठेवलेल्या चणा पिकांचे ढिग पावसामुळे पूर्णतः भिजले असून गहू, चणा, तूर आणि कपाशी पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर येत आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडले असून नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हिंगणघाट तालुक्यातील गोजी शिवारात गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसल्याचे प्राथमिक अंदाज आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वीज पडून मृत्यू

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
Next Post
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

ताज्या बातम्या

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा