टीम मंगळवेढा टाईम्स।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विदेशात काळा पैसा असल्याचे माझ्याकडील पुरावे मी ईडीला देणार आहे. उद्धव ठाकरेंची कुठे कुठे किती प्रॉपर्टी त्याची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी येणाऱ्या काळात ईडीला देणार असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. त्यासोबत नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादानेच अडकवण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आता शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी पराभव पचवायला पाहिजे, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र फेटाळून लावत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासोबतच सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते.
नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या कोरोनाकाळातील माझे कुटंब माझी जबाबदारी अशा अनेक उपक्रमांवरून टीका केली होती. त्यासोबतच 100 कोटींच्या खंडणीप्रकरणावरूनही संसदेत टीका केली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज