टीम मंगळवेढा टाईम्स ।
मी सीआयडीत आहे, माझा तुमच्यावर गांजा विकत असल्याचा संशय आहे. असे म्हणून उपरी येथील दोघांना थांबवून त्यांच्याकडील चार तोळे सोने असा
एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेहल्याची घटना वाखरी (ता.पंढरपूर ) येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
अंकुश रामचंद्र मोहिते (वय ४९ , रा.उपरी, ता. पंढरपूर ) हे त्यांच्या मेहुणे किसन लक्ष्मण नागणे (रा.उपरी,ता.पंढरपूर ) यांच्यासह पुतण्याच्या लग्नासाठी मोटार सायकलीवरून शेगाव दुमाला येथे बुधवारी गेले होते.
लग्न झाल्यानंतर ते परत गावी जात होते. ते वाखरी (ता . पंढरपूर) दरम्यान पोहोचले असता त्यांच्या गाडीच्या पाठीमागून पुढे जाऊन एक मोटारसायकलस्वार आला.
त्यांना मोहिते यांना थांबविले. याच दरम्यान त्याने रस्त्याने चालत जाणाऱ्यास थांबवून त्यांच्या खिसे तपासले. त्याच्या गळ्यातील चेन काढून त्याचे रुमालात बांधून त्याच्याकडे दिली.
तो मोटारसायकलीवरील अनोळखी एकजण मोहिते व नागणे यांच्याकडे आला. मी सीआयडीत आहे. मी गांजापुड्या विकणारा माणूस तपासत आहे.
असे म्हणून त्याने मोहिते यांचे खिसे तपासले व तुम्ही गांजापुड्या विकणारा माणूस आहे असे मला वाटले असे तो म्हणाला.
गांजाच्या पुड्या विकणारा माणूस सापडेपर्यंत तुम्ही असे सोने घालून फिरू नका असे सांगितले. यामुळे मोहिते यांनी गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन,
एक पिळ्याची एक तोळ्याची सोन्याची अंगठी व एक खड्याची एक तोळ्याची सोन्याची अंगठी असे सोन्याचे दागिने व खिशातील लायसेन्स
व इतर कागदपत्र असे काढल्यावर ते त्या अनोळखी माणसाने रुमालात बांधले. ते पुन्हा मोहिते यांच्याकडे दिले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज