टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सांगोला महामार्गावरील शेलेवाडी चौकात रस्ता क्रॉस करणार्या मोटर सायकलवरील पती-पत्नीस भरधाव वेगाने येणार्या वेगनॉर कारने जोराची धडक देवून
त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या घटनेची हकिकत अशी, दि.18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 च्या दरम्यान एम एच 06,सी.बी.6735 या शाईन मोटर सायकलवरून यातील मयत विजय मारूती जाधव (वय 40) व त्यांची पत्नी कविता विजय जाधव (वय 35 रा.वाकणवाडी जि.रायगड सध्या शेलेवाडी)
मंगळवेढयाहून बाजार करून शेलेवाडीकडे परतत असताना शेलेवाडी चौक क्रॉस करतेवेळी सांगोल्याकडून येणारी वेगनॉर कार क्र.के.ए.28 एम ए.2351 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून
त्या मोटर सायकलस्वारास जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करून दोघाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असल्याची फिर्याद अजय गोपीनाथ जाधव (वय 19) याने दिल्यावर अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अपघातग्रस्त मयत कुटुंबीय हे मूळचे रायगड जिल्हयातील असून उपजिविका करण्यासाठी बावची ता.मंगळवेढा येथे लाकडापासून कोळसे पाडण्याचे काम करीत आहेत.
अपघातानंतर अज्ञात चालक फरार झाला असून पोलिसांनी अपघातग्रस्त कारगाडी जप्त करून पोलिस स्टेशन आवारात आणून लावली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज