टीम मंगळवेढा टाईम्स । पुण्यात आजारपणाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील गंगा विष्णू संकुल, कर्वेनगर येथे घडली आहे. Husband also committed suicide by killing his wife in Pune
अविनाश हेमंत गोरे (69 ) आणि वैशाली हेमंत गोरे (66) अशी मृतांची नावं आहेत. आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पती अविनाश गोरे यांनी लिहून ठेवली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करुन सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी फिर्याद दिली आहे.
अविनाश गोरे हे एलआयसीमध्ये स्टेनो ग्राफर होते. त्यांना एक कन्या असून ती विवाहित आहे. त्या सिंहगड रोडला वास्तव्यास आहेत.
त्यामुळे कर्वेनगरमध्ये ते दोघेच पती-पत्नी राहत होते. पत्नी वैशाली गोरे यांना वयोमानानुसार अनेक व्याधी होत्या. त्यांच्या आजारपणाला कंटाळून अविनाश गोरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर स्वत: ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.कर्वेनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबत या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज