टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागाड मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज नक्की घ्या आणि शक्य असल्यास आज प्रवास टाळा.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
विदर्भात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात अधून-मधून पासाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.
पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.
Heavy rains continue in Mumbai, warning from the meteorological department for the state
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज