मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सायबर चोरांच्या लुटीच्या पद्धतीमध्ये सातत्याने बदल होत असल्याचं दिसून येतंय. डिजिटल अरेस्टच्या घोटाळ्यानंतर आता त्यांनी त्यांचा मोर्चा बँकांच्या केवायसी व्हेरिफिकेशनकडे वळवल्याचं दिसून येतंय.
केवायसी अपडेट करा असा एक व्हॉट्सअॅप मेसेज टाकून त्यावरून ओटीपी घ्यायचे आणि अकाऊंटमधून सगळे पैसे उडवायचे असा धंदाच सायबर चोरांनी सुरू केला आहे. दिल्लीची एक महिला त्याला बळी पडली असून काही सेकंदातच चोरांनी तिच्या अकाऊंटवरून 47 लाख रुपये चोरल्याची घटना घडली.
दिल्लीतील ही महिला निवृत्त प्राध्यापिका असून ती सायबर चोरांच्या फसवणुकीला बळी पडली आणि काहीच सेकंदात आयुष्यभराची कमाई गमावली. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तिला केवायसी व्हेरिफिकेशनचा मेसेज आला. तो ओपन केल्यानंतर तिच्या अकाऊंटमधून सर्वच पैसे उडाले.
मेसेजवर एपीके फाईल पाठवली
या प्रकरणी निवृत्त प्राध्यापिकेला प्रथम व्हॉट्सॲपवर तिचा केवायसी पेंडिंग असल्याचा मेसेज आला. यानंतर महिलेला एक फोनही आला. त्यामध्ये फसवणूक करणाऱ्याने स्वतः बँक कर्मचारी असल्याचं सांगितलं.
केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर कॉलवर असताना तिला ही प्रक्रिया करायला सांगितली.
यानंतर महिलेला व्हॉट्सॲपवर आणखी एक मेसेज आला. त्यामध्ये APK (अँड्रॉइड पॅकेज किट) फाईलची लिंक देण्यात आली होती. ती फाईल तिला डाउनलोड करण्यास सांगण्यात आली. फाईलमधील मालवेअरमुळे, क्लिक होताच तिचे बँक तपशील चोरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेची सर्वच बचत काढून घेतली.
कोणतीही बँक व्हॉट्सअॅपवर मेसेज करत नाही
कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना व्हॉट्सॲपद्वारे केवायसी करण्यास सांगत नाही किंवा कोणतीही बाह्य एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगणार नाही. सायबर गुन्हेगार अनेकदा इमर्जन्सी असल्याचे कारण सांगतात आणि वापरकर्त्यांना फसवतात.
त्यावेळी त्यांच्याकडून वैयक्तिक माहिती काढतात. त्यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांचे पैसे लुटतात किंवा एखादी करप्ट फाईल पाठवून सर्व डेटा आपल्याकडे घेतात आणि आयुष्यभराची कमाई लुटतात.
केवायसी करण्यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइट किंवा ॲपवर जाऊ शकता. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे किंवा ॲप डाउनलोड करणे किंवा OTP शेअर करणे टाळा. अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, नेहमीच पडताळणीचा मार्ग अवलंबला पाहिजे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज