टीम मंगळवेढा टाईम्स ।
लग्नात हुंडा दिला नसून आमचा मानपानही केला नाही या कारणावरुन 21 वर्षीय विवाहितेला शेण काढण्याच्या फावड्याने मारुन शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी
पती बाबाराम शिवाजी बंडगर,सासरे शिवाजी बंडगर, दीर तात्यासो शिवाजी बंडगर, बाळू शिवाजी बंडगर तसेच सासू अनुसया शिवाजी बंडगर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नशीता बाबाराम बंडगर (रा.पडळकरवाडी) हिचा विवाह चार वर्षापुर्वी पती बाबाराम शिवाजी बंडगर यांचेबरोबर झाला आहे.
लग्नानंतर काही दिवसांनी पती, सासरे, दीर, सासू यांनी हुंड्यासाठी व माहेरहून पैसे आणण्यासाठी शारिरीक, मानसिक त्रास देवून मारहाण करु लागले.
मात्र काही दिवसात संसार सुरक्षित होईल असे समजून फिर्यादी निमुटपणे त्रास सहन करीत होती. दि.15 फेबु्रवारी रोजी दुपारी 12 च्या दरम्यान फिर्यादी घरी असताना वरील आरोपीने लग्नात हुंडा दिला नाही,
मानपान केला नाही या कारणावरुन शेण काढण्याच्या फावड्याने व काठीने फिर्यादीच्या डाव्या पायावर मारले.
यावेळी सासू,सासरे व दीर यांनी तिला आणखीन मारा, तिचा जीव घ्या? असे म्हणून प्रोत्साहीत केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच माहेरच्या लोकांना काही सांगितले तर तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादीचा भाऊ याने जखमी झाल्याचे पाहून सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याचा अधिक तपास पोलीस नाईक काळे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज