टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
लहान मुलांचे, नेतेमंडळींचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे झाल्याचे आपण नेहमी पाहतो. पण 100 वर्षांच्या आजींचा वाढदिवस साजरा केला, हे पाहिलेय का?
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे आजीचा परिवार व नातवंडांनी आपल्या आजीचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन केले आहे.
वाढदिवसानिमित्त आजीचा परिवार, सर्व कुटुंब तर एकत्र आलंच, शिवाय परिसरातील नागरिकसुद्धा हा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहाने सहभागी झाल्याने या आनंदाने रुक्मिणी भगवान पाटील या आजी भारावून गेल्या.
आज सायंकाळी 7 वाजता म्हसोबा वस्ती, वाढेगाव रोड लक्ष्मी दहिवडी येथे रुक्मिणी भगवान पाटील या आजींचा 100 वा वाढदिवस आजीच्या परिवाराच्या वतीने साजरा करण्यात येत आहे.
वाढदिवसा नंतर मराठी व हिंदी बहारदार गाण्यांचा कार्यक्रम तसेच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज आजीला धरून आजीचे 100 जणांचे कुटुंब पूर्ण झाले आहे व त्याचा आज 100 वा वाढदिवस हा एक योगायोगच समजला पाहिजे.
आजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अँड. दत्तात्रय तोडकरी, आजीचा परिवार, पाटील कुटुंबीयांनी दारात भव्य मंडप टाकला. केक कापण्यासाठी आकर्षक सजावटही केली आहे.
लक्ष्मी दहिवडी येथील यंदा ऐन यात्रेत आजीचा वाढदिवस आल्याने उत्साहात भर पडली. आज प्रमुख पाहुणे म्हणून सर्व नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
समाधान वाटले : रुक्मिणी भगवान पाटील
आज सकाळपासून घरात एवढी गर्दी पाहून मला काही समजत नव्हते. आज सगळेच कसे काय एकत्र आलेत, हे कळेनाच. माझ्या नातींनी नवे लुगडे नेसवले आणि सांगितलं, आजी तुझा आज वाढदिवस साजरा करायचा आहे. मला काय कळेनाच? खूप कष्टांतून संसार केला, आज सगळे सुखात आहेत, हे पाहून समाधान वाटले.
सगळ्यांनाच खूप आनंद झाला
आजीचा परिवाराच्या वतीने रुक्मिणी भगवान पाटील या आजीचा वाढदिवस आज साजरा होणार आहे. घरातील सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आमची आजी 100 व्या वर्षीही ठणठणीत आहे, याचे आम्हाला निश्चितच खूप समाधान आहे. आम्ही सर्वांनी विचार करून वाढदिवस साजरा करायचे ठरवले आहे. त्यामुळे सर्व नातेवाईक व ग्रामस्थ एकत्र आले आहेत. – अँड. दत्तात्रय तोडकरी,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज