टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यात सत्तासंघर्षाचं नाट्य वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.
कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे यांच्यावर मुंबईतील एका खासगी रूग्णालाय उपचार सुरू होते.
कोश्यारी रूग्णालयात दाखल झाले असताना त्यांच्या कामाचा पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं.
पण राज्यपाल कोश्यारींचा कार्यभार इतर कोणाकडेही दिला जाणार नाही असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
राज्यपाल कोश्यारी यांना आज सकाळी 10 वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते राजभवनावर परतले. राज्यातील राजकीय अस्थिरता पाहता राज्सपाल कोश्यारी यांची भूमिका महत्वाची असणार आहे.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सध्या सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेनं बाहेर पडण्याची मागणी या गटाची आहे. शिंदे गटाकडे बहुमत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटासोबत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल बडोद्यात एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राज्यात सत्ता स्थापनेच्यादृष्टीने चर्चा झाली.
पण जोपर्यत एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगळा गट स्थापन केल्याचं, भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीनिकरण झाल्याच्या निर्णयाचं पत्रं.
किंवा भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देत असल्याचं पत्रं दिलं जात नाही, तोपर्यंत राज्यपाल वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी आज आज तुर्तास भेटण्यास कोणालाही वेळ दिलेला नाही, असं राज्यपाल कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. राज्यपालांना पुढील काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.(स्रोत:Zee News)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज