mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 25, 2022
in राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे.सध्याच्या संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

याबाबतचा आदेश राज्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे.

दरम्यान, जुन्याच संचालक मंडळांना मुदतवाढ मिळाल्याने संचालक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

याबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर बाजार समितीच्या मतदार यादीवर आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती.

त्याबाबत देण्यात आलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका घेण्यापूर्वी अगोदर गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेण्याचे म्हटलेले आहे.

त्यानुसार जोपर्यंत गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होत नाही; तोपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांना २३ जानेवारीपासून पुढील तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढीच्या काळात बाजार समितीच्या संचालकांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तथापि विशिष्ट परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असणार आहे.

त्याबाबतचा प्रस्ताव पुण्याचे पणन विभागाचे संचालक यांच्यामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे राज्यभरासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, माढा, अक्कलकोट या बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली आहे.

या निवडणुका 16 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु होती.

प्रारुप मतदार याद्यांवर हरकती मांडण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनामुळे महाराष्ट्र कृषी पणन अधिनियम 1963 कलम 59 मधील तरतुदींनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. (स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कृषी उत्पन्न बाजार समिती

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणीं’ची प्रतीक्षा वाढली! जूनचा हप्ता जमा न झाल्याने महिलांची बँकेत चकरा; कधी मिळणार पैसे? लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा हप्ता अडकू शकतो

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
Next Post
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

ऊर्जामंत्री राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, वीज कापण्याशिवाय पर्यायच नाही; शेतकरी वर्गातून प्रचंड नाराजी

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..