टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातून सध्या पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले असून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता हे पाणी सध्या हिळळी बंधाऱ्यात पोहोचले असून
तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी आज सायंकाळपासून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
सध्या नदीत पाणी असूनही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते,शेतात असलेली उभी पिके डोळ्यासमोर वीज नसल्याने जळून चालली होती,
केवळ दोनच तास वीज पुरवठा सुरू असल्यामुळे शेतात पाणी येण्याअगोदर वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,
त्यामुळे नदीकाठचे शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्या संदर्भात वारंवार मागणी करत होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्यामुळे आज सोमवारी सायंकाळपासून वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज