टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळेे मागील वर्षात सोन्याच्या किंमती आभाळाला पोहचल्या होत्या. कोरोनाच्या अचानक झालेल्या उद्रेकामुळे शेअर बाजार खाली आला. भारताबरोबर अमेरिकेत देखील हीच परिस्थिती कायम होती.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.सोन्याच्या दरातील गेल्या वर्षभरातल्या झालेल्या चढ-उतारानंतर आता पुन्हा सोन्याचे दर खाली आहेत.
कोरोना काळात 56,000 वर गेलेली किंमत पुन्हा आता 46,500 वर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या एका महिन्यात सोन्याची किंमत 3,000 ने खाली आली आहे. या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याचा दर 47,000 वर होता
पण मंगळवारी सोने बाजार उघडताच किंमत थेट 500 रूपयांनी खाली आली आणि 46,500 वर स्थिर झाली.जानेवारीत कोरोना आकडेवारी कमी होतं होती त्या दरम्यान सोन्याची किंमत 51,000 वर आली होती. त्यानंतर दर सातत्याने कमी होत आहेत.
डाॅलरचे दर आणि आयात शुल्क कमी झाल्याचा परिणाम सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तुंच्या किंमतीवर झाला आहे.
हे दर पुन्हा किंचीत वर जाऊन खाली येण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याची किंमत स्थिर नसल्याने किंमतीत दररोज चढ-उतार होताना दिसत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज