टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-मरवडे मार्गावर एका मोटर सायकलीस भरधाव वेगात आलेल्या टमटमने जोराची धडक दिल्याने संभाजी मारुती भोरकडे (रा.भालेवाडी) हा गंभीर जखमी होवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी टमटम चालक जमीर इन्नूस मणेरी (रा.मरवडे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील मयत संभाजी भोरकडे हे दि.९ रोजी सायंकाळी ६ वाजता एम.एच.१३ डी. यू. ५२३६ या बजाज प्लॅटिना मोटर सायकलवरुन मरवडेहून मंगळवेढ्याकडे जात असताना
तळसंगी गावच्या शिवारातील आरटीओ ऑफिसजवळ आल्यावर मंगळवेढ्याकडून भरधाव वेगात येणारे महिंद्रा कंपनीचे एम.एच.४५ ए.एफ.३४०८ या टमटम चालक जमीर मणेरी याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून
रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मोटर सायकलस्वारास जोराची धडक देवून गंभीर जखमी करुन त्याचे मृत्यूस कारणीभूत झाला असल्याची फिर्याद महादेव मारुती भोरकडे (रा. भालेवाडी) याने दिल्यावर टमटम चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज