mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दुष्काळी तालुक्याचा दावा फसवा, काँग्रेसचे प्रशांत साळे यांच्या गंभीर आरोपाने खळबळ; सरकारविरोधात आंदोलन छेडणार असल्याचा दिला इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2023
in मंगळवेढा, राजकारण
कलाकारांनो! मंगळवेढा काँग्रेस कमिटीतर्फे नवरात्र महोत्सवात लोककला महोत्सवाचे आयोजन; तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करावा, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. परंतु शासनाने तालुक्याला ‘ट्रिगर वन’ मधील निकष लावले नाहीत. नवे निकष लावत तालुक्यातील निवडक शेतकऱ्यांनाचा लाभ दिला जात आहे.

परिणामी गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आता सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यावर मदत जमा व्हावी, यासाठी मंगळवेढा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिला आहे.

तालुकाध्यक्ष साळे म्हणाले, ‘तालुक्याच्या आर्थिक विकासात भर देणारे चोकोबा आणि बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. परिणामी तालुक्यामध्ये नवे रोजगार निर्माण होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे नवोदित व्यवसायभिमुख तरुणांना स्थलांतरित व्हावे लागत आहे.

मंगळवेढा उपसा सिंचन योजना, महात्मा बसवेश्वर व चोकोबा स्मारक या प्रश्नासाठी आम्ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, याचे श्रेय काँग्रेसला मिळेल म्हणून याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.’

दुष्काळी तालुक्याचा दावा फसवा

सोलापूर लोकसभा मतदारसंघ दुष्काळी तालुक्यातून वगळण्यात आला होता. यामध्ये नव्याने दुष्काळात समावेश करताना ज्या आठ सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील अनेक सवलतींपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे.

तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, शेतकऱ्यांनी खरिपातील पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. या दुष्काळ सवलतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व फळपिकासाठी आर्थिक मदत सरसकट देणे आवश्यक आहे.

परंतु तसे आश्वासन नव्या शासन निर्णयामध्ये देण्यात आले नाही. त्यामुळेच तालुक्याला दुष्काळी म्हणून जाहीर केल्याचा दावा हा फसवा आहे’, अशी टीकाही साळे यांनी केली.

सरकारविरोधात आंदोलन छेडणार

सरकारच्या कुटील डावामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळ तालुक्यात मिळणाऱ्या योजनेपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण साेलापूर मतदारसंघात काँग्रेस नेत्या आमदार प्रणिती शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभा करणार आहोत.

सध्या सत्ताधारी पक्षाने लोकशाही धोक्यात आणली आहे. मात्र, हीच लोकशाही टिकवण्याची जबाबदारी माध्यमाची आहे. यापूर्वी काही प्रश्नावर काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर सरकारला त्या प्रश्नाची दखल घ्यावी लागली होती. आता श्रेयासाठी ते प्रश्न तसेच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोपही तालुकाध्यक्ष साळेंनी या वेळी केला आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर कवचाळे, ओबीसी तालुकाध्यक्ष पांडुरंग माळी, विष्णू शिंदे, दिलीप जाधव, मारुती वाकडे, भीमराव मोरे, बापू अवघडे, सुनीता अवघडे, संदीप पवार, शहाजी कांबळे, आकाश भोसले, संतोष शिरसागर, अविनाश मुंगसे, रवी काटे, नागेश आकळे, संदीप पवार आदी उपस्थित होते.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
Next Post
मंगळवेढ्यात दिवाळीत कपडे खरेदीसाठी ग्राहकांची MH13 oh बेबी & MH13 मेन्स वेअरला पसंती; लहान-मुलांपासून तरुणांना आकर्षण

दिवाळीत लहान मुलांचे व तरुणांचे कपडे खरेदीसाठी मंगळवेढ्यातील MH13 च्या दोन्ही शॉपमध्ये ग्राहकांच्या रांगा

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..