टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील डॉ.गौरव भीमराव पडवळे याने बेंगलोर येथील आदिचंचनगिरी वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या अंतिम परीक्षेत विशेष प्रावीण्य गुणवत्ता श्रेणी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कष्टाने सर्व मुलांना शिक्षित करणारे श्री केरप्पा नारायण पडवळे यांचे नातू व प्रतिकृत परिस्थितीतून शिक्षण घेऊन गेले 30 वर्ष
मंगळवेढा तालुक्यातील जनतेची तळमळीने व सेवाभावा वृत्तीने रुग्ण सेवा करणारे डॉक्टर भीमराव केराप्पा पडवळे व डॉक्टर जयश्री भीमराव पडवळे यांचे पुत्र
डॉक्टर गौरव भीमराव पडवळे हे आदिचंचनगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बेंगलोर या नामकीत मेडिकल कॉलेजमधून 67.5 टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत
त्यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा येथून झाले आहे. आठवी ते बारावीचे शिक्षण सिंहगड इंग्लिश मीडियम स्कूल पंढरपूर येथे झाले आहे.
या उल्लेखनीय देशाबद्दल त्यांचे आय.एम.ए चे अध्यक्ष डॉक्टर मधुकर कुंभारे, निमाचे अध्यक्ष डॉक्टर अतुल निकम, मंगळवेढा होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शाकीर सय्यद, डॉक्टर शरद शिर्के व तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी अभिनंदन केले आहे.
ज्ञानदीप इंग्लिश मीडियमचे संस्थापक संभाजी सलगर यांनीही त्याचे अभिनंदन केले. तसेच सर्व पंचक्रोशीतून डॉक्टर गौरव पडवळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनीही त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले आहे.
पुढील वैद्यकीय उच्च शिक्षणामध्ये उत्तुंग यश संपादन करण्याचा शाश्वत संकल्प डॉ.गौरव याने व्यक्त केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज