mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

परतफेड! पवारांचा डाव भाजपला घाव, ‘हे’ तीन बडे नेते आज ‘शिवरत्न’वर एकत्र येणार; माढ्यासह सोलापूरचं समीकरण बदलणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2024
in सोलापूर
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आज रविवारी राज्यातील 3 बडे नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे अकलुजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत.

आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तर येत्या 16 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या भेटीनंतर माढ्यासह बारामती, सोलापुरचं राजकीय समीकरण कसं असेल याचा हेच समजून घेऊ.

भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज धैर्यशील मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्याआधी शरद पवारांसह सुशीलकुमार शिंदे हे अकलूज इथल्या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी येणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणातील तीन मातब्बर नेते एकाच छताखाली येणार असल्यामुळे सोलापुरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय.

माढ्यासाठी पवार-मोहितेंचा सलोखा..

मिळालेल्या माहितीनुसार, 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांना लोकसभेत पाठविण्यासाठी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघ सोडून स्वत:साठी दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केली होती.

यावेळी विजयसिंह मोहिते पाटलांनीच शरद पवारांना माढा मतदारसंघातून सुरक्षितपणे लोकसभेत पाठवलं होतं. आता भाजपने धैर्यशील पाटलांना उमेदवारी नाकारल्यामुळे मोहिते पाटील घराणं नाराज आहेत.

त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटलांच्या मदतीची परतफेड करण्याची संधी शरद पवारांकडे आहे.

याआधी म्हणजेच 2019 च्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणामुळे मोहिते पाटलांनी शरद पवारांपासून फारकत घेतली होती. मात्र पुन्हा एकदा पवार-मोहितेंचा सलोखा वाढल्यामुळे भाजपची अडचण वाढलीय. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदेंही सोबत आल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलणार आहे.

सोलापूर मध्यच्या जागेवरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदारकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिलीय. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटील कुटुंबाचं कायम एकछत्री वर्चस्व राहिलंय.

यापूर्वी मोहिते-पाटील हे घराणं ज्याच्या पाठीशी उभं राहील, तोच इथला खासदार असं समीकरण प्रचलित होतं. म्हणूनच मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा मिळवून सोलापुरात प्रणिती शिंदेंचा विजय सुकर करण्याची सुशीलकुमार शिंदेंची रणनीती आहे. सध्याच्य घडीला जरी मोहिते-पाटलांच्या विरोधकांचं बळ वाढलं असलं. तरीही थेट मोहिते पाटलांविरोधात भूमिका घेणं भाजपच्याही फायद्याचं नाही.

खरं तर महायुतीच्या माध्यमातून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रातील पवारांचं राजकारण संपुष्टात आणण्याची रणनिती आखलीय. मात्र आपणही तेल लावलेले मल्ल आहोत, हे पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. माढ्यात भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची लोकसभेची वाट बिकट होण्याची चिन्हं आहेत. शिवाय सोलापूर दक्षिणमध्ये राम सातपुतेंविरोधात तीन बडे नेते काय रणनीती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोहिते पाटीलशरद पवार

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

June 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले पुढे…

June 9, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 10, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

June 9, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

June 8, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

प्रेमाचा भयंकर शेवट! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात; नेमकं घडलं काय?

June 8, 2025
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! पीएम किसानची फाइल डाऊनलोड केली; सोलापूर जिल्ह्यातील तहसीलदाराचा मोबाइल हॅक; ‘ही’ बाब झाल्याने घटना उघडकीस

June 7, 2025
Next Post
मंगळवेढ्यात नव्या प्रभाग रचनेने राजकीय गणिते बदलणार, हरकतीमुळे फेरबदल; कोणत्या प्रभागात कोणती गल्ली.. घ्या जाणून

आय लव्ह यू मंगळवेढाचे होणार 'आपला मंगळवेढा'; नगरपालिकेसमोरची पाटी दिसेल मराठी भाषेत

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ खत दुकानांवर निलंबनाची कारवाई; भरारी पथकाच्या तपासणीत आढळले गंभीर दोष

June 12, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणावर स्टे आहे की नाही? कोर्टाने काय म्हटलं?; सुनावणीवेळी काय काय घडलं? जाणून घ्या…

June 12, 2025
मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

मोठी बातमी! नवरा मेहुनीला घेऊन बेपत्ता, बायकोची मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार; एक महिना होत आला पत्नी अन् कुटुंब शोध घेऊन हैराण

June 12, 2025

आदेश धडकला! स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठी बातमी; प्रभाग रचना करण्याचा सरकारचा आदेश

June 11, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खळबळ! आयुष्य उद्ध्वस्त करेन, जीव घेण्याची धमकी, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप; पत्र लिहून हवालदार गायब; पती हरवल्याची पत्नीची तक्रार

June 11, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो पेरण्यांची घाई नको! ‘या’ तारखे नंतरच मोसमी पाऊस; मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा, कृषी विभागाचं आवाहन

June 12, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा