टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील एका गावात एका घरातील चार जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ब्रह्मपुरी येथे डेंग्यूसदृश आजाराचे एकाच कुटुंबात चार रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी धूर फवारणी व पावडर टाकण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
ब्रह्मपुरी येथे गवळीवाड्यात एकाच कुटुंबातील चौघांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने ते मंगळवेढा व पंढरपूर येथे खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या डासांचे प्रमाण वाढल्याने या आजाराला बळकटी मिळत आहे. डेंग्यू आजारावर मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात लागणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण रेफर करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात या आजाराबाबतची औषधे उपलब्ध झाल्यास रुग्णांचा वेळ व पैसा वाचणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या मंगळवेढा शहरात व परिसरातही डेंग्यूसदृश रुग्ण, चिकूनगुणिया, ताप, सर्दी आदींच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने येथेही ते रुग्ण खासगी दवाखान्यांत उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज