टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे स्विफ्ट कारमध्ये ३४ हजार रुपये किमतीची दारू घेवून आल्याची गोपनीय माहिती मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांना मिळताच
त्यांनी पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकून दारू स्विफ्ट कारसह जवळपास ५ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी माजी उपसरपंच राहुल सयाप्पा कसबे (वय.३४ रा.नंदेश्वर) याला पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नंदेश्वर येथे दि.९ रोजी सायंकाळी ६.०० वा. बेकायदा दारू घेवून ग्रामपंचायत कार्यालयासमोर
एक इसम पांढऱ्या रंगाच्या गाडीत दारू बाळगून असल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांना मिळताच त्यांनी पोलिस हवालदार दत्तात्रय तोंडले, पोलिस नाईक सुनिल मोरे, शिवाजी पवार,
पोलिस शिपाई प्रशांत चव्हाण आदीनी खाजगी वाहनातून जावून सदर ठिकाणी पाहणी केली असता त्यातील आरोपी राहुल कसबे हा गाडी क्र.एम एच ०७, आर.०००२ मध्ये
३४ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी संत्रा ५७६ सिलबंद बाटल्या , १२ बॉक्समध्ये गाडीत बाळगून होता.
पोलिसांनी गराडा घालून त्याला ताब्यात घेवून मालाबाबत अधिक चौकशी केली असता त्याने हुन्नूर गावातील लवटे यांचे सरकारमान्य देशी दारू दुकानातून घेवून आल्याचे सांगितले.
पोलिसांनी कारसह ५ लाख ३४ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, तालुक्यातील अवैध धंदयाविरूध्द डी.वाय.एस.पी. राजश्री पाटील यांनी कडक कारवाईची मोहिम सुरू केली असून दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून
जवळपास ७५ हजार रुपयांची बेकायदा दारू जप्त केली असून या कारवाई मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई सातत्याने पुढे चालू राहणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज