टीम मंगळवेढा टाईम्स ।
सन २०२३च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये महसूल विभागात दुष्काळ घोषित झाला आहे. त्यामधील परीक्षा शुल्क परत देण्याबाबतचा निर्णय जाहीर झाला आहे. त्याबाबतची कार्यवाह सुरू झाली असून,
सोलापूर शहर व जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २९० विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार असून, विभागीय सचिव, पुणे विभागीय मंडळ, पुणे यांच्या पत्रानुसार शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागविणे सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
शासनाने ३१ ऑक्टोबर अन्वये सन २०२३च्या खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार यापूर्वी इयत्ता १२वी व इयत्ता १० वी फेब्रुवारी व मार्च २०२४च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी परतावाबाबतचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करण्यास कळविले आहे.
त्यानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती मागविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
१२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
अद्याप काही शाळांनी माहिती भरलेली नाही. तरी अद्याप ज्या शाळांनी माहिती ऑनलाइन सादर केलेली नाही, अशा अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती १२ एप्रिलपर्यंत ऑनलाइन भरण्याबाबत मुदतवाढ देण्यात आली आहे.(स्रोत:लोकमत)
दहावी, बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शाळांकडून माहिती मागविणे सुरु झाले असून, शाळांनी तत्काळ माहिती भरावी, यास विलंब झाल्यास व त्यापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य हेच जबाबदार राहतील, याची सर्वानी नोंद घ्यावी. सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यामिक, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज