mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठा धक्का! दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2025
in क्राईम, राज्य
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

३ वर्षापूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या बीएएसएफ जवानाचं कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरगुती वादातून पाच दिवसांपूर्वी जवानाच्या पत्नीने गंगा नदीत उडी घेतली. बरीच शोध मोहिम घेतल्यानंतरही तिचा थांगपत्ता लागला नाही.

पत्नी सोडून गेल्यानं पतीच्या वाटेला विरह आला. त्यातच सासरच्यांनी त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. यातून नैराश्य आलेल्या जवानानं टोकाचे पाऊल उचलले आहे. शनिवारी दुपारी दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन त्याने गंगा नदीत उडी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

पोलीस गंगा नदीत उडी घेतलेल्या बाप आणि मुलाचा शोध घेत आहेत परंतु जसंजसं त्यांना शोधण्यात वेळ होत आहे तशी आशा संपत चालली आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2025/08/VID-20250820-WA0076.mp4

प्रत्यक्षदर्शीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजता एक युवक त्याच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन टॅक्सीतून बैराज पूरच्या गेट नंबर १७ ला आला. त्याने आधी पायातील चप्पल काढली, मोबाईल चप्पलेजवळ ठेवला.

इतरांना काही कळणार इतक्यातच त्याने मुलाला मिठीत घेऊन गंगा नदीत उडी घेतली. टॅक्सी चालकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही. त्यावेळी पुलाची दुरुस्ती काम करणारे लोक तिथे जमा झाले. अचानक झालेल्या दुर्घटनेने घटनास्थळी गोंधळ माजला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी माहिती घेतली, त्यात नदीत उडी घेणाऱ्या तरुणाची ओळख बीएसएफ जवान राहुल असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली.

बोटीच्या मदतीने बीएसएफ जवान आणि त्याच्या दीड वर्षाचा मुलाचा शोध सुरू होता परंतु संध्याकाळपर्यंत काही हाती लागले नाही. राहुल आणि त्याची पत्नी मनीषा यांचं ३ वर्षापूर्वी लव्ह मॅरेज झाले होते.

सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, परंतु हळूहळू किरकोळ गोष्टींवरून वाद सुरू झाले. राहुल सध्या अहमदाबाद येथे तैनात होता. मार्च महिन्यात तो १ महिन्याची सुट्टी घेऊन आला होता. त्याचवेळी पॅरालाइसिस अटॅक आल्याने त्याने ५ महिने सुट्टी वाढवली होती.

५ दिवसांपूर्वी राहुल आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. त्या वादात मनीषा घराबाहेर पडली आणि तिने गंगा नदीत उडी घेतली. मनीषाचा अद्याप शोध लागला नाही. परंतु तिच्या नातेवाईकांनी राहुलवर मानसिक छळ, हुंड्यासाठी त्रास दिल्याची तक्रार दिली. पत्नीचा विरह आणि सासरच्यांनी केलेले आरोप यामुळे राहुलला नैराश्य आले होते.

अलीकडेच पत्नीने गंगा नदीत उडी घेतली, त्यानंतर राहुलने त्याच्या दीड वर्षाच्या मुलासह गंगेत उडी घेतली. त्यामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या या तिघांचाही शोध घेतला जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नदीत उडी मारली

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा