टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगांव येथे ३६ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजी जयाप्पा सपताळे,जयाप्पा चंद्राप्पा सपताळे,गौरी शिवाजी सपताळे या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील ३६ वर्षीय पिडीत महिला ही दि. १६ रोजी शेतात गेली होती.यावेळी शेताच्या बांधालगत थांबलेला पिडीत महिलेचा दिर तथा आरोपी शिवाजी सपताळे याने पळत येवून तुला लय गुर्मी आली आहे का , तुझी मस्ती जिरवतो असे म्हणून पाठीमागील बाजूस ब्लाऊज धरून मक्याच्या पिकात नेवून शरीराशी झोंबाझोंबी करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीचे सासरे तथा आरोपी जयाप्पा सतपाळे व शिवाजी यांची पत्नी गौरी यांनी घटनेच्या ठिकाणी फिर्यादीस काहीही न विचारता शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस नाईक पाटील हे करीत आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज