टीम मंगळवेढा टाईम्स । वारंवार सूचना देऊनदेखील कोविड हेल्थ केअरमध्ये रुग्णाला उपचार करण्यास असमर्थता दर्शविल्याने होटगी रोडवरील कोळगिरी नगर येथील युगंधर मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलवर सोलापूर महापालिकेच्या वतीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Filed a case at Yugandhar Hospital in Solapur)
तसेच युगंधर हॉस्पिटलचू मान्यता रद्द करण्याबाबत प्रशासनास नोटीस देण्यात येणार आहे , असे मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी सांगितले.
शहरांमध्ये कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी ६ कोविड तर १२ कोविड हेल्थ केअर सेंटर म्हणून घोषित केले असून , त्यात युगंधर मल्टिस्पेशलिस्ट हॉस्पिटलचा समावेश आहे.
पालिका प्रशासनाकडून कोविड रुग्णावर तत्काळ उपचार झाले पाहिजेत , असे वारंवार सूचना देऊन देखील युगंधर हॉस्पिटलने सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्याने विजापूर नाका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली.
पुढील काळामध्ये कोविड , नॉन कोविड रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज