टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ साठी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले आहे.
यासाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स व आयसीआयसीआय लोम्बार्ड जीआयसी ही विमा कंपनी आहे.
गहू बागायतसाठी विमा संरक्षित रक्कम ३१ हजार रुपये असून शेतकऱ्याने ४६५ रुपये प्रतिहेक्टर भरावयाची आहे.
हरभऱ्यासाठी १७ हजार ५०० असून , शेतकऱ्यांनी २६३ , रब्बी कांद्यासाठी ५५ हजार असून , शेतकऱ्यांनी २७५० , भुईमूगासाठी ३० हजार असून शेतकऱ्यांनी ४५० रुपये भरावयाची आहे.
गहू , हरभरा , कांदा या पिकासाठी १५ डिसेंबर , तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२२ अंतिम दिनांक आहे.
ही कागदपत्रे जोडा
सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ७/१२ उतारा, ८ अ , आधार कार्ड , बँक पासबुक, पीक पेरणी स्वयंघोषणापत्र अथवा तलाठी दाखला, आदी कागदपत्रासह विमा हप्ता भरू त्याची पोहोचपावती घ्यावी, असे गणेश श्रीखंडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज