टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात एकूण ८३ गावे असून, महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतामध्ये जाऊन स्वतः ई-पीक पाहणी व्दारे पिकाची नोंदणी करणे आवश्यक असल्याने ती तात्काळ करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
सध्या देशात व राज्यात उदभवलेली नैसर्गिक परिस्थिती पाहता अतिवृष्टी व नैसर्गिक वादळे, अनैसर्गिक मौसमी अनियमितता निर्माण झाली आहे.
परिणामी सध्या किंवा भविष्यात शासनाकडून अनुदान जाहीर केल्यास ते वाटप करणेसाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक पेराची नोंद ई-पीक पाहणी अॅप वरुन करणे अत्यंत गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतातील पीक पेराची नोंदणी ई-पीक पाहणी अॅप व्दारे न केलेस शासनाकडील अनुदान बाधित शेतकरी यांना मिळणार नाही याची दक्षता घ्यावी.
महसूल प्रशासनाकडून जाहीर आवाहन करणेत येत आहे की, सर्व शेतकऱ्यांनी आपआपले शेतातील पीक पेराची नोंद तात्काळ ई-पीक पाहणी अॅप वरून करून घ्यावी.
या कामी अडचणी उदभवलेस संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी, मंडल अधिकारी (महसूल), तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यालय यांचेशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज