mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एवढ्या शेतकऱ्यांना होणार लाभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एवढ्या शेतकऱ्यांना होणार लाभ


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

उद्धव ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ३४ लाख शेतकऱ्यांना सुमारे २९ हजार ७१२ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी १५ फेब्रुवारीला जाहीर होणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.


विशेष म्हणजे, फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तब्बल तीन वर्षे घेतली होती. मात्र, ठाकरे सरकार येत्या मे महिन्याअखेर पात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या प्रयत्नात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली.


नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सहकार विभागाच्यावतीने थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत चुकीच्या व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जखाती आधार कार्डशी संलग्न करून खात्री करण्यात येत आहे.


फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांकडून २८ रकान्यांचा अर्ज भरून घेण्यात आला होता. या वेळी मात्र तसे न करता योजनेची अंमलबजावणी सुटसुटीत कशी राहील, याकडे राज्य सरकारचा विशेष कटाक्ष आहे. जिल्हा बँकांकडील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची छाननी शासनाच्या सहकार विभागामार्फत शासकीय ऑडिटर्सकडून करण्यात येत आहे. तर व्यापारी बँकांकडील कर्जखात्यांची तपासणी कोअर बँकिंग यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतरही योजनेअंतर्गत एखाद्या अपात्र व्यक्तीला कर्जमाफीचे लाभ दिले गेल्याचे आढळून आल्यास त्याला संबंधित बँकेला जबाबदार धरले जाणार आहे.


पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना २९,७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
भागवत सप्ताहसाठी आलेल्या महाराजाने विवाहित महिलेस नेले पळवून

भागवत सप्ताहसाठी आलेल्या महाराजाने विवाहित महिलेस नेले पळवून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा