मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथे ऊसाच्या पिकाला खत टाकत असताना एका मजुराचा विज वितरण कंपनीच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होवून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील खबर देणारे असीफ शेख (रा. शिवाजीनगर,मंगळवेढा) यांची अरळी येथे गट नं.८७ मध्ये शेती असून दोन वर्षापासून त्यांच्याकडे शेतमजूर म्हणून
गणेश सुर्यभान गारखेडे (रा. जालना) हे कुटुंबासह शेतात रहावयास आहेत. दि. २३ रोजी सकाळी ११.०० च्या सुमारास मयत हे ऊसाच्या पिकास खत घालण्यासाठी गेले होते. दुपारी २.४५ पर्यंत ते खत टाकून परत न आल्याने
मयताची पत्नी सानिका हिने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे तीच्या पतीबाबत चौकशी केली. तसेच अशपाक इनामदार व काही लोकांनी मिळून ऊसाच्या शेतात शोध घेतला असता
शेतातील ऊसात वीज वितरण कंपनीची तार तुटून पडल्याने सदर तारेस चिटकून गणेश गारखेडे हे मयत झाल्याचे दिसून आल्याचे दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज