मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
जिवंत आई असताना तिला मृत दाखवून मुलाने जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
यासंदर्भात बार्शी पोलिसांनी सौदागर विष्णु डांगरे (राभोईंजे, ता. बार्शी) याच्याविरोधात मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी संबंधित तपास अधिकारी दिलीप ढेरे यांना दिले आहेत.
याबाबत बार्शी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमनबाई विष्णु डांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी या जिवंत असताना त्या मयत असल्याचे भासवून मुलगा सौदागर याने तशी बनावट कागदपत्रे तयार केली.
शिवाय कोर्टापासून खरी वस्तूस्थिती लपवून ठेवून फिर्यादीच्या नावे असलेली जमीन फिर्यादीच्या परस्पर सौदागर याने स्वत:च्या नावावर करण्याच्या हेतून फिर्यादीची कोणत्याही प्रकारची संमती नसताना
सौदागर याने आर्थिक लाभाकरिता बेकायदेशीर मृत्यू नोंद होण्याबाबतचे आदेश घेऊन फिर्यादीची व कोर्टाची फसवणूक केल्याप्रकरणी सौदागर याच्यावर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज