टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यासारख्या वाहनविषयक कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. यात 1 फेब्रुवारी 2020 किंवा 31 मार्च 2021 रोजी वैधता संपणाऱ्या सर्व कागदपत्रांचा समावेश आहे.
यामुळे नागरिकांना सामाजिक अंतर राखून वाहतुकीशी संबंधित सेवा मिळविण्यात मदत होईल. कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयाने आज यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्गदर्शक सूचनांचे महत्त्व समजून योग्य रितीने याची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन करोना साथीच्या काळात नागरीक, वाहतूकदार आणि इतर संघटनांना त्रास होणार नाही, अशी विनंती केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.
राज्य प्रशासनांना सूचना जारी केल्या
मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की यासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रशासनांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड 19 चा प्रसार थांबविण्याची गरज लक्षात घेऊन मोटर व्हीकल्स एक्ट 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 शी संबंधित कागदपत्रे 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली पाहिजेत, असे या सल्लागारात नमूद केले आहे.
या नियमानुसार ती सर्व कागदपत्रे यात कव्हर होतील ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर समाप्त झाली आहे किंवा 31 मार्च 2021 पर्यंत समाप्त होईल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज