
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने ८३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यात आता हवामान विभागाने मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार का, असा सवाल मुंबईकरांसमोर उभा ठाकला आहे. Excessive rainfall will not increase the risk of corona – experts say
त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे, मात्र आता वैद्यकीय तज्ज्ञांनी या पावसामुळे कोरोनाचा धोका वाढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता व पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, पावसामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल अशी शक्यता नाही. याला कोणताही आधार नाही.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













