टीम मंगळवेढा टाईम्स । जमिनीची सुपीकता पीक उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरत असते. मात्र, सध्या उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि अतिरीक्त पाणी वापरामुळे जिल्ह्यातील शेतजमिनीचा पोत बिघडला असून त्यात कॅल्शियम या दुय्यम अन्नघटकाचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी पाणी व माती परीक्षण करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र जलमित्र संस्थेचे बाळासाहेब लवटे यांनी केले.
ब्रह्मपुरी( ता मंगळवेढा) येथे शेतकरी वाचवा अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी रणजितसिंह अशोक पाटील हे होते
सोलापूर जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढले असून त्यात पाणी आणि रासायनिक खत वापराचे प्रमाण अतिरिक्त आहे. ऊस आणि फळबागांसाठी पाण्याचा असंतुलित वापर करण्यात येत आहे. त्यातून मंगळवेढा तालुक्यातील जमिनी वेगाने चोपण होत आहेत.
शेतजमिनीत हायड्रोजन, ऑक्सीजन, कार्बन, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नघटकांचा समावेश असतो. त्याशिवाय दुय्यम व सूक्ष्म अन्नघटक असतात. रासायनिक खतांच्या अतिप्रमाणामुळे मुख्य अन्नघटकांसह दुय्यम अन्नघटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मातीचे भौतिक गुणधर्म बिघडत असून जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सतीश गुरव म्हणाले, ‘खताचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकाखाली ठेवणे, पाण्याचा अतिवापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. या कारणांमुळे उत्पादनवाढीत घट होऊन समस्याग्रस्त क्षेत्रात वाढ झाली आहे’.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील जमिनीत कॅल्शियम घटकाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचे प्रमाण ४ ते २७ टक्के आहे. जमिनीत १० टक्क्यांपेक्षा जास्त कॅल्शियम हानीकारक असते. नेमकी उलटी स्थिती जिल्ह्यात आहे. हिरवळीचे पिके जमिनीत गाडून आणि सेंद्रीय खतांचा वापर करून जमीन पूर्ववत सुपीक करता येते. मात्र, त्याबाबत शेतकरी आणि कृषी विभाग या दोन्ही पातळीवर ठोस प्रयत्न नसल्याने जमीन नापिक होण्याचा धोका वाढला आहे.गुणधर्म बिघडलेल्या जमिनीत सुधारणा करणे शक्य आहे. मात्र, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता नसल्याने सुपीकता टिकवण्यात अडचणी येतात.
यावेळी सतीश गुरव, सागर गुरव, सुरेश वाघमोडे, सतीश पवार, रवींद्र पुजारी, रणजित पाटील,विकास पुजारी , उदयसिंह पाटील, प्रशांत पाटील, भोपाळ पाटील, हरिदास चव्हाण, सिद्धेश्वर डोके, गोटू पाटील, प्रवीण पाटील, भारत चौगुले, यासिन सुतार, राजेंद्र पुजारी, मनोज चव्हाण, किशोर देशमुख, महेश पुजारी यांच्यासह माचनूर, रहाटेवाडी, बठाण, ब्रह्मपुरी, या परिसरातील शेतकरी उपस्थित होते
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज