मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीच्या आवारा मधील फळे व भाजीपाला सौदे लिलाव बंद केलेले आहे.
त्यामुळे शेतक-यांनपुढे शेतमाल विकणेसाठी अडचण निर्माण झाली आहे याचा विचार करून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधून शेतमाल कसा विकता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी व्यापारी यांना शेतमाल उपलब्ध मिळवुन देणेत येत आहे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयांमध्ये शेतकरी व व्यापारासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून सदर नियंत्रण कक्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची व त्यांच्या अपेक्षीत दराची माहिती दुरध्वनीवरुन नोंदणी करावी.
व्यापार्यांकडून होणार्या मागणीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला व फळे विकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी बाजार समितीचे कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०२१८८/२२०३३१ , ९७३००३२७८८ संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज