mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जनभावनेचा विचार करून अतिक्रमण मोहिम थांबवावी; आ.समाधान आवताडे यांच्या प्रशासनाला सूचना; दखल घेऊन मोहीम थांबणार का?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा शहर व परिसरात होवू घातलेली अतिक्रमण मोहिम जनभावनेचा विचार करून थांबवावी अशा सूचना आ.समाधान आवताडे यांनी प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी, संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवेढा शहर व परिसरात कोरोना महामारीमुळे मोठया प्रमाणात छोटया मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून आत्ता कुठे बाजार पेठ पूर्व पदावर येत असताना लांबलेला पाऊस यामुळे व्यापारी हवालदिल झाले असून

येणारा राखी पौर्णिमा, श्रावणमास, श्रावण पोळा, गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव हे व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे सण असताना अतिक्रमण मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे समजते.

परंतू एकंदरीत मंगळवेढा शहर व परिसरात असणाऱ्या व्यापारी व जनभावनेचा विचार करून ही अतिक्रमण मोहिम राबवू नये.

परंतू कोणत्याही छोटया मोठया व्यवसायिकांना त्रासदायक ठरणारी अतिक्रमण मोहिम राबवू नये अशा प्रकारच्या सूचना आ. समाधान आवताडे यांनी संबंधित प्रशासनाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

३२६ अतिक्रमणे काढण्याची प्रशासनाची तयारी

मंगळवेढा शहरातील पंढरपूर रोड, बोराळे नाका व शहरातील ३२६ अतिक्रमणे काढण्याच्या दृष्टीने नगरपालिका व पोलिसांनी तयारी केली असून, दुष्काळाबरोबर ऐन सणासुदीच्या काळात या मोहिमेने खळबळ उडाली आहे. अतिक्रमणे काढताना व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी होऊन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील प्रमुख व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटल्यामुळे या दुकानांत खरेदीसाठी आलेल्या अनेक वाहनधारकांनी आपली वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी नयोमी साटम यांनी रस्त्यावर थांबणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करत मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला.

यावेळी काही वाहनधारकांनी दुकानांसमोर पार्किंग सुविधा नसल्यामुळे आमची वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. वाहनांसाठी पार्किंग नसल्याने आमच्यावर दंड आकारणीचे कारणच नाही, अशी तक्रार केली.

याशिवाय दामाजी चौक येथे छोट्या व्यावसायिकांमुळे बस स्थानकातून बाहेर पडताना वाहतूक कोंडी होऊ लागली. याशिवाय शालेय परिसरात या छोट्या हातगाड्यांमुळे वाहतूक रस्त्यांवर कोंडी होऊन अपघाताची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे नागरिकांनी या व्यावसायिकांची अतिक्रमणे काढण्याबाबत तक्रारी केल्या.

नवीन पोलिस अधिकारी असल्यामुळे या तक्रारींची दखल घेतली जाऊ लागली. तक्रारींचा ओघ वाढला. सध्या दुष्काळी परिस्थितीत आणि सणासुदीच्या काळात दुकानदारांना या अतिक्रमण मोहिमेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. प्रशासन आणि व्यावसायिक यांच्यात व्यक्त केली जात आहे. योग्य समन्वय साधण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. अतिक्रमण काढण्यासाठी सहा प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांबरोबर नगरपालिकेचे २५ कर्मचारी, एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, सफाई कर्मचारी तैनात केले आहेत. स्वतःहून अतिक्रमणे काढून याबाबत यापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. – माळी, प्रभारी मुख्याधिकारी

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

संतापजनक! मंगळवेढ्यात कोरोनाग्रस्तांची हॉस्पिटलकडून लूट; बिलाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेंग्यू सदृश रुग्णांना मिळणार मोफत उपचार

September 22, 2023
गावप्रमुखांनो! विकास कामांच्या पाठपुराव्याला कमी पडू नका, मी विकास करायला निधी कमी पडू देणार नाही; आ.आवताडेंची ग्वाही

खुशखबर! पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील उर्वरित मंडळाना देखील मिळणार पीकविमा; आ.आवताडे यांच्या प्रयत्नांने शेतकऱ्यांना दिलासा

September 22, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

सभासदांनो! दामाजी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी; ‘या’ विषयांवर सभेमध्ये विचार-विनीमय होणार

September 22, 2023
उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी हजेरी अनिवार्य; गैरहजरांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी नाही

मोठी खळबळ! पोलीस भरतीसाठी तरुणीला दिला बनावट दाखला: मंगळवेढ्यातील महा-ई-सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल

September 22, 2023
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

September 21, 2023
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

प्रतिबंधात्मक कमान! मंगळवेढा शहरातून जाणारी अवजड वाहने रोखण्याकामी ‘या’ शासकिय कार्यालयात अधिकाऱ्यांची आज बैठक

September 21, 2023
काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

मोठी बातमी! मंगळवेढ्यात विवाहित महिलेची गळफास घेवून आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू

September 21, 2023
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

September 20, 2023
मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, स्विफ्ट कार जिंकण्याची संधी; आजच संपर्क साधा 9021873644, 9604284224

मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, स्विफ्ट कार जिंकण्याची संधी; आजच संपर्क साधा 9021873644, 9604284224

September 20, 2023
Next Post
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

पीक विमा! सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान, भरपाईसाठी टक्केवारी ठरणार, शेतात जाऊन करणार पाहणी; असा होईल सर्व्हे

ताज्या बातम्या

धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने या लढ्याकडे गांभीर्याने पाहावे; अभिजीत पाटील यांनी चौंडी येथील उपोषणास भेट घेऊन दिला जाहीर पाठिंबा

धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने या लढ्याकडे गांभीर्याने पाहावे; अभिजीत पाटील यांनी चौंडी येथील उपोषणास भेट घेऊन दिला जाहीर पाठिंबा

September 22, 2023
संतापजनक! मंगळवेढ्यात कोरोनाग्रस्तांची हॉस्पिटलकडून लूट; बिलाचे लेखापरीक्षण करण्याची मागणी

शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डेंग्यू सदृश रुग्णांना मिळणार मोफत उपचार

September 22, 2023
गावप्रमुखांनो! विकास कामांच्या पाठपुराव्याला कमी पडू नका, मी विकास करायला निधी कमी पडू देणार नाही; आ.आवताडेंची ग्वाही

खुशखबर! पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील उर्वरित मंडळाना देखील मिळणार पीकविमा; आ.आवताडे यांच्या प्रयत्नांने शेतकऱ्यांना दिलासा

September 22, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

भारत-ऑस्ट्रेलियाचे आजपासून वनडे सामने लाइव्ह कुठे पाहू शकता, स्टार-सोनी नाही तर हे चॅनेल लावा; जाणून घ्या…

September 22, 2023
मराठा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; अजित पवारांच्या उपस्थितीतील पहिल्या कॅबिनेटमध्ये घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

थेट जनतेपर्यंत! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲपवर; सर्व योजना आणि निर्णयांची माहिती मिळणार

September 22, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

सभासदांनो! दामाजी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी; ‘या’ विषयांवर सभेमध्ये विचार-विनीमय होणार

September 22, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा