टीम मंगळवेढा टाईम्स ।
राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची केलेल्या तालुक्यातील तळसंगी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होत परिवर्तन विकास पॅनेलचा पराभव केला.
पराभूत गट हा भाजप आ.समाधान आवताडे समर्थकांचा असून विजयी गट भाजपचेच माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थक दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांचा आहे.
तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणूका सामंजस्य भूमिकेतून बिनरोध निघतात मात्र तळसंगी सोसायटीची निवडणूक लागून प्रतिष्ठेची झाली.गत सोसायटीची निवडणूक देखील प्रतिष्ठेची केली.त्यातही अध्यक्ष शिवानंद पाटीलाचा गट विजयी झाला.
मतदान करण्यासाठी दोन्ही गटाकडून मतदारांना मतदान केंद्रावर आणले जात होते सकाळच्या सत्रात मतदानावरून दोन गटात बाचाबाची झाली. निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले, एकूण 866 मतदारांपैकी 739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये जवळपास 66 मतदान हे मयत आणि पारगाव होते.निकालानंतर मोठा जल्लोष केला.
उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे
सर्वसाधारण गट विजयी उमेदवार
सतीश सावताडे (428), रतन बिचुकले(451),भगवान दुधाळ(437), नानासो गायकवाड(452), दादासो कोंडोरी(466), बलभीम पाटील (465 ),चिदानंद पाटील(454)
,शिवाजी शिंदे(459)
पराभूत उमेदवार
,
औदुंबर बिचुकले (216), ईश्वर दुधाळ (210) ,शिवाप्पा हुग्गे (224 )संजय जामगोंडे(225),समाधान कोडग (227),राजेंद्र कुडगे(230),अतुल मुंगसे (229),प्रशांत शेणवे (254)
राखीव मतदार संघ विजयी
किसन दोडके (483),पराभूत अरविंद ऐवळे (242)
महिला राखीव मतदार संघ विजयी
कांताबाई पाटील (466),पद्माबाई पांढरे (444), उषाताई अवताडे(235),शोभा पाटील(265),
इतर मागासवर्गीय मतदार संघ
विजयी अशोक खंडागळे (484),पराभूत गोरख कोळी (239), भटक्या आर्थिक दुर्बल मतदार संघ विजयी महादेव बिचुकले (487) पराभूत बाळासाहेब पांढरे (237)
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरविंद कांबळे यांनी काम पाहिले तर मतमोजणीसाठी ज्ञानेश्वर भंडगे, संतोष वाळके, पी एन सुळ,वाय.जी.काकडे,जी.एस.लांडे,सुश उमडाळे, गजानन जाधव, भागवत कांबळे, प्रताप माने, डी.पी.राऊत,एम.बी.सावंत,ए.डी.टाक, भ.वि.यलमार,सु.ल.मासाळ,सुभाष जगदाळे,यांनी काम पाहिले. निकालानंतर विजयी उमेदवाराने जल्लोष साजरा केला.
माझ्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी निवडणुक लादली
सोसायटी व ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे केल्यामुळे मतदारांकडून आमच्या गटाला संधी दिली जाते.दामाजीच्या निवडणुकीत सभासदांनी विश्वास ठेवून संधी दिली त्या विश्वासाला पात्र राहण्याची भूमिका संचालक मंडळाने बजावली. माझ्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी निवडणुक लादली पण सभासदांनी मतदानातून मतपेटीतून योग्य उत्तर दिले.-शिवानंद पाटील,अध्यक्ष दामाजी शुगर.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज