mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

“विठ्ठल”च्या चेअरमन पदाची ‘या’ तारखेला निवड; अभिजीत पाटील यांच्या ताब्यात आता अर्धा डझन साखर कारखाने

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 19, 2022
in राजकारण, सोलापूर
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकऱ्यांचा राजवाडा असलेल्या श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड येत्या गुरुवारी दि.२१ जुलै होणार आहे.

चेअरमनपदी उद्योजक अभिजीत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे तर व्हाईस चेअरमनपदी कोणाला संधी दिली जाते ? याची संपूर्ण तालुक्याला उत्सुकता लागली आहे.

शेतकऱ्यांचा राजवाडा आणि तालुक्याच्या अर्थकारणाचा कणा अशी ख्याती असलेल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.

सत्ताधारी भालके-काळे तसेच युवराज पाटील गटाला बाजुला सारत सभासदांनी अभिजीत पाटील यांच्या रूपाने साखर कारखानदारीत कर्तृत्व अन् नेतृत्व सिद्ध केलेल्या नव्या दमाच्या तरुणाकडे सत्ता सोपवली.

यानिमित्ताने भालके गटाची तब्बल १८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. मात्र, स्व
भारत भालके यांच्याच विचारांचा वारसा घेत एकेक दमदार पाऊल टाकत असलेल्या अभिजीत पाटील या नव्या पर्वाची सुरूवात झाली आहे.

येत्या गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. चेअरमनपदी विराजमान होत असलेल्या अभिजीत पाटील यांच्या ताब्यात आता १ सहकारी आणि ५ खासगी असे तब्बल अर्धा डझन साखर कारखाने असणार आहेत.

याचवेळी या कारखान्याच्या व्हा. चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याचीही उत्सुकता संपूर्ण तालुक्याला आहे.

स्वतः अभिजीत पाटील, प्रा.डॉ.बी.पी. रोंगे यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांच्या नेतेमंडळींच्या समन्वयातून व्हा.चेअरमन पदाचा उमेदवार ठरविला जाणार आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

सहा कारखाने अन् सहावे चेअरमन

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्री विठ्ठलाच्या नावाने असलेल्या या कारखान्याचे संस्थापक, पहिले चेअरमन कर्मवीर कै.औदुंबर अण्णा पाटील यांच्या कारकिर्दीचे, उत्कृष्ठ कारभाराचे आजही राज्यभर दाखले दिले जातात.

त्यांच्यानंतर कै.राजाभाऊ पाटील, कै .वसंतदादा काळे, कै . भारत भालके आणि भगीरथ भालके या पाच जणांनी चेअरमनपद भूषविले.

प्रत्येक टप्प्यावर या कारखान्याच्या नेतृत्वाने समाजकारण, राजकारणात नावलौकिक मिळविला. त्यांच्यानंतर आता सहावे चेअरमन होण्याचा बहुमान अभिजीत पाटील यांना मिळत आहे. याचवेळी त्यांच्या ताब्यात हा सहावा कारखाना आल्याचा योगायोगही जुळून आला आहे.

निवडीनंतर होणार मिल रोलर पूजन

आर्थिक अडचणींच्या गर्तेत सापडल्याने दोन हंगाम बंद राहिलेला हा कारखाना यंदा कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा शब्द अभिजीत पाटील यांनी सभासदांना दिला होता.

निकालाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यादृष्टीने त्यांनी पाऊले टाकत कारखाना सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

याचाच एक भाग म्हणून चेअरमन निवडीनंतर लगेच मिल रोलरचे पूजन करून पुढचा टप्पा पूर्ण करणार असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; आज जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 14, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावच्या सरपंचांना धाडल्या नोटिसा; तुमचे सरपंच पद का रद्द करू नये? पटापट बघा सर्व गावांची नावे

सोलापूर जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ४ ऑगस्टला मतदान; मंगळवेढ्यातील चार

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा