टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्यात उष्णतेची लाट असतानाच काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह पावसाची कोसळू शकतो.
राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेच प्रमुख केएस होसळीकर यांनी व्यक्त केलाय.
विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपीटही होऊ शकते, असं होसळीकर यांनी ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
वेधशाळेने गुरुवारी 4 एप्रिलपासून राज्यात मेघगर्जना होईल, असं म्हटलं होत. त्यानंतर होसळीकर यांच्याकडून वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याचा इशार देण्यात आलाय.
हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम जिल्हाला ऑरेंज दिला आहे. त्यामुळे यवतमाळ आणि वाशिम, सोलापूर, पुणे जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 15 जिल्ह्यांना गारपीटीचा कोणताही धोका नसल्याचे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज