टीम मंगळवेढा टाईम्स । देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे दोन महिन्याहुन जास्त काळ लॉकडाउन सुरू आहे अशापरिस्थितीत नोकरीसाठी,मजुरीसाठी तसेच विविध कारणांमुळे परगावी गेलेले मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील नागरिकासोबत संपर्क साधून प्रशासनाच्या मदतीने ६२४ नागरिकांना दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी आपल्या स्वगृही आणून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
महाराष्ट्रासह गुजरात,तामीळनाडू (ऊस तोडणी कामगार),मध्यप्रदेश, कर्नाटक, मुंबई,पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी मंगळवेढ्यातील व पंढरपूर मधील अनेक नागरिक अडकून पडले होते परजिल्ह्यात किंवा परराज्यात असल्याकारणाने काय करावे हे अनेक लोकांना समजत नव्हते अशा अनेक लोकांचे फॉर्म भरण्यापासून ते परवाना घेऊन स्वगृही पोहोचेपर्यंत सर्व जबाबदारी समाधान अवताडे यांनी घेत पार पाडली आहे.
या सर्वांची माहिती गोळा करताना एक ऑनलाइन लिंक बनवून ते लिंक व्हाट्सअप व विविध सोशल मिडिया च्या माध्यमातून एकमेकांना पाठविण्यात आली.त्या लिंक चा उपयोग करून नागरिकांनी आपली माहिती दिली ती माहिती गोळा झाल्यावर त्या नागरिकांना फोनद्वारे संवाद साधण्यात आला व विविध अडचणींचा आढावा घेऊन त्या अडचणी सोडवण्यात आले.
त्यांनी केलेल्या या कामामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे ,अजूनही काही नागरिक अथवा नातेवाईक किंवा विद्यार्थी जर कुठे अडकून पडले असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले आहे.
आम्ही अडकून पडलो होतो. स्वतःहून यावं परत तर कोणतेच मार्ग निघत नव्हता. यात समाधान (दादा) अवताडे यांचे कडून खूप-खूप मदत झाली. फक्त त्यांच्या मुळेच घाटकोपर वरुन आम्ही स्वगृही येऊ शकलो. मनापासून धन्यवाद दादांचे.-संजय भगरे,भाळवणी मंगळवेढा
मंगळवेढा माझे सासर आहे मी कामामुळे बोलीरिवली ला राहते. मंत्रालयात कामाला असून सुद्धा आमची फार गैरसोय झाली होती. अशातच समाधानदादा अवताडे यांच्या कडून संपर्क झाला. संकट काळात गावाकडून कोणीतरी विचारले हे फार समाधानकारक होतं. त्यांच्यामुळे घरी पोहोचले त्यांचे मनापासून धन्यवाद.-विजया संगशेट्टी,नंदुर, मंगळवेढा
कर्नाटकमध्ये विट भट्टीवर मजुरी करत होतो. महिना झाला काम बंद असल्याने खूप हाल होत होते. लहान लहान लेकरं आहेत त्यांच्या पोटापाण्याची काळजी लागून राहिली होती. पण समाधानदादाच्या फोनमुळे आधार मिळाला त्यांनी आमची व्यवस्था करून पंढरपूर ला आम्हाला सुखरूप पोहोचवले,घरी पोहोचेपर्यंत ते आमची विचारपूस करत होते त्यांच्या या गोरगरीबाप्रती असलेल्या तळमळीला आमचा सलाम-रमजान पठाण, पंढरपूर
————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज