टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाढत्या उन्हामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी लवकर भरून एक तास अगोदर सोडण्यात यावी ; अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,
शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांच्याकडे केली होती. आता सकाळी ७.१० ते ११ या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
तसे आदेश प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ . लोहार यांनी काढले आहेत. जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा विद्यार्थी व शिक्षक पालक यांना सामना करावा लागत आहे.
रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी , शिक्षक यांना दिलासा देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली होती.
सोमवारी शिक्षक समितीचे नेते अनिल कादे , सुरेश पवार , सिध्दाराम माशाळे , राजन ढवण , दयानंद चव्हाण यांनी शिक्षणाधिकारी डॉ . किरण लोहार यांची भेट घेऊन पत्र काढण्याची आग्रही मागणी केली. त्यास यश आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज