टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने
सुप्रसिद्ध व्याख्यान डॉक्टर प्रीती शिंदे यांचे व्याख्यान व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती श्रीराम फाउंडेशन अध्यक्षा सौ.सुप्रिया जगताप व जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ इंदुमती जाधव यांनी दिली.
नगरपरिषदेचे माजी पक्षनेते अजित जगताप यांच्या संकल्पनेतून आज सायंकाळी 5.00 वाजता सौ. जयमला गायकवाड माजी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्या शुभहस्ते व मीनाक्षी कदम माजी अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या अध्यक्ष तेखाली मारुती पटांगणामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
गरज जिजाऊंच्या विचारांची या विषयावरती डॉ. प्रा प्रीती शिंदे यांचे व्याख्यान देणार असून आजच्या पिढीला मासाहेब जिजाऊ यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे तसेच त्यांचे तत्वे कार्यप्रणाली समजणे गरजेचे आहे.
तसेच मंगळवेढा शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान जयंतीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील ‘या’ महिलांचा होणार सन्मान
राजश्री संभाजी पाटील,
श्रीमती. लताबाई सुरेश शिकतोडे,
श्रीमती. विजया आप्पा वाकडे,
सौ. मंगल नेताजी जाधव, सौ.सब्जपरी अरिफ मकानदार, सौ. वर्षा अनिल दत्तू, सौ. अशा आबा वाले, कु. हसीना मोहम्मद सुतार, सौ. स्मिता प्रवीण जडे, सौ. अवंती चेतन पटवर्धन,
सौ. रागिनी पांडुरंग कांबळे, सौ. सुरेखा मनोहर खरात, सौ. लक्ष्मीबाई सुभाष उप्पेवाड, इनरव्हिल क्लब मंगळवेढा.,ज्ञानेश्वरी महिला स्वयं साह्य बचत गट,
व तसेच महिलांसाठी कार्यरत असणारे बचत गट समन्वयक श्री. युन्नुस मोगल, श्री.राजेंद्र खताळ, श्री. प्रदीप सपकाळ, व संयोगीनी बचत गट, सौ संगीता रजपूत, सौ.सुनीता चव्हाण , सौ.आशा पाटील, यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमासाठी मंगळ शहर व तालुक्यातील महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज