टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्यावतीने डॉक्टर डे निमित्त आज रविवार दि.३ जुलै रोजी सायंकाळी ४.०० वा. महिला हॉस्पीटलच्या ए.सी. हॉलमध्ये आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान सोहळा व डॉक्टरांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष केशव जाधव यांनी दिली.
सदर प्रसंगी मंगळवेढा येथील दिवंगत डॉ.शंकरराव कुलकर्णी, डॉ.भालचंद्र कुलकर्णी, डॉ.माधव गोखले, डॉ.रामचंद्र बडोदकर, डॉ.किशोर देशमुख,डॉ.अरूण कापशीकर व डॉ.अशोक पागे यांचे स्मरण म्हणून त्यांना
जाहिर करण्यात आलेल्या आरोग्यरत्न पुरस्काराचे वितरण त्यांच्या कुटुंबियांना करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे भूषविणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढयाचे पोलिस निरिक्षक रणजित माने, नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव उपस्थित राहणार आहेत.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ.मधुकर कुंभारे, निमा डॉक्टर्स संघटना मंगळवेढा शाखाध्यक्ष डॉ. सुनिल जाधव,
होमिओपॅथी असोसिएशन मंगळवेढाचे अध्यक्ष डॉ. शाकिर सय्यद उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात मंगळवेढा शहर व तालुक्यातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सर्वानी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष केशव जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज