मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । हॉस्पिटलमध्ये महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे पाच तुकडे केल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये घटली आहे. आरोपी डॉ.शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले, या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. The doctor made five pieces of the baby by performing an illegal abortion; Incident in town
अहमदनगर तालुक्यातील जखणगाव यातील गंधे सर्जीलकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांना निनावी फोन आला. त्यांनी गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरणबीकर यांना माहिती दिली. डॉक्टरांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई केली.कारवाई दरम्यान आरोपी डॉ. शंकरप्रसाद उर्फ सुनील गंधे यांनी त्या महिलेचा गर्भपात करून त्या अर्भकाचे निर्घृणपणे पाच तुकडे केल्याचे समोर आले.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज