mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात चोरांची दिवाळी सुरूच; शेतकऱ्याच्या विद्युत मोटारीची चोरी तर कार व ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक आठजण गंभीर जखमी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 20, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील तलावात शेती सिंचनासाठी बसविलेली विद्युत मोटार ,इलेक्ट्रीक केबल,इलेक्ट्रीक स्टार्टर असा एकूण 13 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी हणमंत सुरवसे यांची डोंगरगाव परिसरात बागायत शेती असून पिकाला पाणी देण्यासाठी येथील तलावातून पाणी उपसण्यासाठी 5 एच.पी.ची आयमेक्स कंपनीची पाणबुडी मोटर व 200 फुट इलेक्ट्रीक केबल,एल.टी.कंपनीचा इलेक्ट्रीक स्टार्टर असे साहित्य तेथे बसविण्यात आले होते.

यातील फिर्यादी हे दि.19 रोजी सकाळी 6.00 वा. पाझर तलावावर विद्युत मोटर सुरु करण्यासाठी गेले असता वरील साहित्य अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवेढा-मरवडे मार्गावर इंडिका कार व ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक, कर्नाटकातील आठजण गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा-मरवडे मार्गावर बिगर नंबरच्या ट्रॅक्टरने राँग साईडने येवून समोरून येणार्‍या इंडिका कारला जोराची धडक दिल्याने कारमधील आठजण गंभीर जखमी होवून अपघातग्रस्त वाहनांचे एक लाखाचे नुकसान करून खबर न देता पळून गेल्याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची हकिकत अशी,दि.16 रोजी पहाटे 5.00 वा.यातील जखमी मल्लाप्पा मादर(वय 30),बसाप्पा मादर(वय 27),फकिराप्पा मादर (वय 45),गंगाधर मादर(वय 10),गजगेप्पा मादर(वय 50),

महादेवी मादर(वय 3),महेंद्र मादर(वय 18),केंचाप्पा मादर(वय 35) हे सर्व कुटुंबिय पंढरपूर येथून त्यांच्या मूळ गावी इंडिका कार क्र. के.ए.25 ए.ए.1896ने  (संकपाळ ता. नरगुंद जि.गदग कर्नाटक) जात असताना

मंगळवेढा-मरवडे मार्गावरील शिवा हुजले यांच्या शेताजवळ अचानक समोरून बिगर नंबरचा  ऊसाचे ट्रॅक्टर चुकीच्या दिशेने येवून इंडिका कारला जोराची धडक दिल्याने सर्वजण त्यात जखमी झाले.

यामधील केंचाप्पा मादर यांना गंभीर मार लागल्याने ते बेशुध्द अवस्थेत होते. या सर्वाना सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर टॅ्रक्टर चालकाने पोलिसात खबर न देता तो पळून गेल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

या अपघाताची फिर्याद पोलिस नाईक चनगोंडा धानगोंडे यांनी दिल्यावर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान,सध्या ऊस् गाळप हंगाम सुरु असल्याने महामार्गावर ऊसाने  भरून डबल ट्रेलर जात असल्याचे चित्र आहे. वाहनचालक हे ट्रॅक्टरमध्ये मोठया आवाजात टेप लावून गाणी ऐकण्यात मश्गूल रहात असल्याने पाठीमागून आलेल्या वाहनाने हॉर्न वाजवूनही त्यास ऐकू जात नसल्यामुळे या कारणाचीही अपघातात भर पडत आहे.

ऊसाची वाहने डबल ट्रेलर भरलेली असल्यामुळे ब्रेक लावल्यानंतरही वाहन जागेवर न थांबता अतिरिक्त बोजामुळे ते पुढे रेटत जात असल्यामुळे अपघातामध्ये भर पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी अतिरिक्त ऊस वाहतूक करणार्‍या व टेप लावून सुसाट वेगाने जाणार्‍या वाहनावर कारवाई करून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दोन दिवसाच्या कालावधीत ऊसाने भरलेल्या वाहनाचे दोन अपघात होवून त्यामध्ये एक जागीच मयत तर आठजण गंभीर जखमी होण्याची घटना घडल्याने वाढत्या अपघाताबाबत मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

July 5, 2022
कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

July 4, 2022
धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

मोठी बातमी! दामाजी निवडणुकीत आ.आवताडे गटाचे पारडे जड; ‘या’ संघटनेने दिला पाठिंबा

July 3, 2022

…अशा बुडव्या कारखानदारांना धडा शिकवला पाहिजे; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

July 3, 2022
चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

चुकीला माफी नाही! मंगळवेढा पोलीस ठाण्याचा ‘हा’ हवालदार निलंबित; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई

July 3, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

July 4, 2022
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

टेंशन वाढले! आषाढी वारीच्या तोंडावरच पंढरपुरात कोरोनाने एकाचा मृत्यू; ‘या’ तालुक्यात ३३ सक्रिय रुग्ण

July 3, 2022
Next Post
खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावचा सरपंच अपात्र; विभागीय आयुक्तांची कारवाई

सरपंचानो! ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची थकबाकी आता सरकार भरणार; सरपंच परिषदेच्या आंदोलनाला यश

ताज्या बातम्या

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

आमदार ॲक्शन मोडमध्ये! विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार; एकमेकांचे तोंडही न पाहणारी मंडळी आज आ.आवताडेंच्या विरोधात एकवटली

July 5, 2022
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

नागरिकांनो! आता मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा; ‘हे’ ॲप करा डाउनलोड

July 5, 2022
कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

कारखाना सुसाट चालणार! आ.आवताडे गटाच्या उमेदवारांनी जाणून घेतल्या सभासदांच्या वयक्तिक अडचणी; ‘या’ तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा होण्याची शक्यता

July 4, 2022
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले; एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

सामान्यांना दिलासा! राज्यात पेट्रोल व डिझेल स्वस्त होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार?

July 4, 2022
धाडस! वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर भीमा नदीत बुडाला; मोठी दुर्घटना टळली

जिल्हाधिकारी साहेब! वाळू ठेक्याची मुदत संपूनही वाळूचा उपसा, चित्रीकरण आलं समोर; कारवाई का नाही?

July 4, 2022
Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

Breaking! मंगळवेढ्यातील डॉक्टरचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चिडलेल्या नागरीकांनी दिला चाेप; पोलिसांनी केले त्याला गजाआड

July 4, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..