मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा येथील प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी सांगली येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी भैरप्पा माळी यांची मंगळवेढा प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आज शासनाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी हा बदलीचा आदेश पारित केला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून आप्पासाहेब समिंदर हे ना-ना विषयांमुळे चर्चेत होते. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा तक्रारीनंतर प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांना स्वतःहून बदली करून घ्या अशी तंबी दिली होती.
त्यातच त्यांच्या कार्यालयातील तलाठी सूरज नळे याला रोड कामासंदर्भात लाच घेताना अटक झाली होती. जवळपास एक महिना तो जेल मध्ये तळ ठोकून राहिला होता.
प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांची बदली कुठे झाली आहे हे मात्र समजले नसून त्यांच्या पदस्थापनेचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज