मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथे एका पशुपालकाने शेतातील वस्तीवर बांधलेल्या ८० हजार रुपये किंमतीच्या दोन गायी चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी तानाजी पाटील यांचे मुंढेवाडी शिवारात शेत असून भाऊ शिवाजी पाटील यांच्या वस्तीवर दि.६ रोजी सायंकाळी ७ वाजता फिर्यादी व त्यांचा पुतण्या हरीबा असे दोघेजण मिळून जर्सी गायचे दूध काढून शेतातील वस्तीवर गायी बांधून गावातील घरी आले होते.
दि.७ रोजी सकाळी ६ वाजता फिर्यादी व त्यांचा पुतण्या दोघे शेतात गेले असता ३ जर्सी गायीपैकी दोन जर्सी गायी बांधलेल्या ठिकाणी दिसून आल्या नाहीत. त्या गायीचा आजूबाजूला परिसरात शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत.
फिर्यादीची खात्री पटली की अज्ञात चोरट्याने दोन जर्सी गायी चोरुन घेवून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज