टीम मंगळवेढा टाईम्स ।
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे आज 500 लोकांना वाफ घेण्याच्या मशिनचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गोणेवाडी गावचे सरपंच तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना रामेश्वर मासाळ म्हणाले, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जगभरात लोकांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रोगावर ठोस असे औषध जरी निघाले नसते तरी वाफ घेतल्यामुळे जगभरातील अनेक रुग्ण या रोगातून मुक्त झाले आहेत.
यामुळेच आम्ही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वाफेच्या मशीनचे वाटप करण्याचे ठरवले आहे. आणि त्यानुसार आज गावात सुमारे 500 लोकांना वाफ घेण्याच्या मशिनचे वाटप करण्यात येणार आहे.
हा सर्व कार्यक्रम कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व अटी व नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून पार पडणार असल्याची माहितीही यावेळी बोलताना रामेश्वर मासाळ यांनी दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज