टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.दीपक साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढा येथे गरजू कुटुंबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले आहे.
मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विजय खवतोडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, माजी तालुकाध्यक्ष भारत बेदरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, माजी नगराध्यक्ष भारत नागणे, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, नगरसेवक प्रवीण खवतोडे,
राहुल,सावंजी,अँड.विनायक नागणे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, जेष्ठ नेते पांडुरंग चौगुले, मुजमिल काझी, हरिभाऊ मळगे, नजीर इनामदार आदीजन उपस्थित होते.
अजित जगताप बोलताना म्हणाले की, जिल्ह्याचे नेते दीपक साळुंखे-पाटील हे सामाजिक व राजकारण नेहमी अग्रेसर असतात.
जिल्ह्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही व्यक्तीचे काम घेऊन गेल्यावर तात्काळ त्या व्यक्तीचे काम मार्गी लावून देण्यासाठी त्यांची धडपड असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज