राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम क्वारंटीनमध्ये होते त्यांची आज टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह अली आहे.
थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या काही दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. त्यांची कोरोना चाचणी चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांना त्रास जाणवत असल्याने खबरदारी म्हणून त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारने या वृत्ताचे खंडन केले आहे. त्याने अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 26, 2020
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.याची माहिती खुद्द पवार यांनी दिली आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज