मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
संतांची भूमी असलेल्या मंगळवेढा शहरात यंदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन नोव्हेंबर अखेरी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती मसापचे सोलापूर प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांनी दिली.
मंगळवेढा येथे विभागीय साहित्य संमेलनासंदर्भात संमेलनाचे निमंत्रक तानसेन जगताप मार्गदर्शनाखाली शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मसाप पुणे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी आणि कल्याण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विभागीय साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आली.
याच वेळी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची, तर कार्याध्यक्षपदी दिगंबर भगरे, कार्यवाहपदी माजी प्राचार्य डॉ. सुभाष कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लवकरच संमेलनाच्या तारखा आणि संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येईल, असे यजमान मसाप, दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी या बैठकीत सांगितले.
मंगळवेढ्याला संत चोखामेळा, संत दामाजी आणि संत कान्होपात्रा यांची साहित्य परंपरा आहे. मंगळवेढ्याच्या संत दामाजी नगरीत हे विभागीय साहित्य संमेलन होत असल्याने शाखेच्या सर्व पदाधिकारी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला आहे.
याच बैठकीत नटसम्राट बालगंधर्व स्मृतिदिनाचे औचित्य साधून नाट्य कलावंत लक्ष्मण नागणे यांचा सत्कार करण्यात आला.
पुणेचा मसाप कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल कल्याण शिंदे आणि पत्रकारिता विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल कार्यकारिणी सदस्य डॉ.अतुल निकम यांचा सत्कार करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज